Ratnairi Rain | मुसळधार पावसामुळे गुहागर-रत्नागिरी मार्गावरील वाहतूक बंद

Ratnairi Rain | मुसळधार पावसामुळे गुहागर-रत्नागिरी मार्गावरील वाहतूक बंद

| Edited By: | Updated on: Sep 07, 2021 | 3:35 PM

रत्नागिरी जिल्ह्यात आता हळूहळू पावसाचा जोर वाढत आहे. संगमेश्वर तालुक्यात देखील पावसानं जोरदार बॅटिंग करायला सुरूवात केली असून त्यामुळे गडनदीला पूर आला आहे. परिणामी आता माखजन बाजारपेठेत पाणी शिरायला सुरूवात झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात आता हळूहळू पावसाचा जोर वाढत आहे. संगमेश्वर तालुक्यात देखील पावसानं जोरदार बॅटिंग करायला सुरूवात केली असून त्यामुळे गडनदीला पूर आला आहे. परिणामी आता माखजन बाजारपेठेत पाणी शिरायला सुरूवात झाली आहे. कळंबुशी येथे देखील पाणी पातळीत वाढ झाली असून सध्या पुलावरून पाणी वाहू लागलं आहे. जिल्ह्यात 9 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत आहे. पण, त्याचवेळी भरतीची वेळ असल्यानं चिंता आणखी वाढली आहे. सध्या समुद्राला उधाण आलं असून लाटा किनाऱ्याला धडकत आहेत. चिपळूणला 22 जुलै रोजी आलेल्या पुराला समुद्राला आलेली भरती हे देखील एक कारण पुढं आलं होतं. त्यामुळे पाऊस आणि भरतीची एकच वेळ आल्यानं चिंता काही प्रमाणात का असेना नक्कीच वाढताना दिसून येत आहे.