Gunaratna Sadavarte : गप्प बसतो का, मुळव्याध उठला.. सदावर्ते अन् मनसे नेत्यामध्ये खडाजंगी, LIVE शोमध्ये घसरली जीभ

Gunaratna Sadavarte : गप्प बसतो का, मुळव्याध उठला.. सदावर्ते अन् मनसे नेत्यामध्ये खडाजंगी, LIVE शोमध्ये घसरली जीभ

| Updated on: Jun 27, 2025 | 1:50 PM

भाजपा सरकारची बाजू घेत गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी मनसेचे प्रकाश महाजन आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या चांगलीच जुंपली.

हिंदी भाषा सक्ती विरोधात मुंबईत होणाऱ्या मनसेच्या मोर्च्या उद्धव ठाकरे यांची शिवेसना सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे 5 जुलै रोजी हिंदीविरोधी आंदोलनात एकत्र दिसणार असल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात यावरून आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याचे पाहायला मिळत असून वातावरण चांगलंच तापलं आहे. या संदर्भात टीव्ही 9 मराठीने एक चर्चा सत्राचे आयोजन केले होते. यामध्ये ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे, भाजपचे केशव उपाध्ये, मनसेचे प्रकाश महाजन आणि वकील गुणरत्न सदावर्ते सहभागी होते. या चर्चेदरम्यान मनसे नेते प्रकाश महाजन यांच्याशी गुणरत्न सदावर्ते यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. प्रकाश महाजन यांनी हा कोण मुंबईचा फौजदार असा उल्लेख करत सदावर्ते यांच्यावर टीका केली. तर यावर बोलताना राज ठाकरे यांना मोर्चा काढता येणार नाही असे म्हणत मनसेवरच हल्लाबोल केला. यावेळी सदावर्तेची जीभ देखील घसरली.

Published on: Jun 27, 2025 01:47 PM