Gunaratna Sadavarte : मला पटतच नाही… सदावर्तेंकडून निशिकांत दुबेंची पाठराखण अन् राज ठाकरेंनाही डिवचलं

Gunaratna Sadavarte : मला पटतच नाही… सदावर्तेंकडून निशिकांत दुबेंची पाठराखण अन् राज ठाकरेंनाही डिवचलं

| Updated on: Jul 11, 2025 | 11:20 AM

निशिकांत दुबे यांनी राज ठाकरे यांना बिहारमध्ये येण्याचे आव्हान देत राज ठाकरेंमध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी बिहारमध्ये येऊन दाखवावं, धरून धरून मारू, असं चॅलेंजच दिल्याचे पाहायला मिळाले होते. यावरच गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्राविरोधात गरळ ओकणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबेची वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून पाठराखण करण्यात आली आहे. निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्रासंदर्भात केलेल्या वक्तव्याचा वेगळा अर्थ घेतला जात असल्याचे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे. इतकंच नाहीतर तर निशिकांत दुबे यांनी ढोबळ भाषेत वक्तव्य केलं. आपल्याला देखील दुसरीकडे गेल्यावर त्रास होऊ शकतो, हे दुबेंनी सांगितलं असल्याचे गुणरत्न सदावर्ते म्हणाले. तर पटक पटके मारेंगे या निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यावर गुणरत्न सदावर्ते यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ‘पटक पटके मारेंगे.. निशिकांत दुबे राज ठाकरे यांच्यासारखं कधीच बोलले नाहीत. मारताना व्हिडीओ शूटींग करा, करू नका… हे बोलणं मला पटत नाही की एखाद्या वक्तव्याचा खिमा करून करून आपल्याला पाहिजे तेच दाखवलं जातं.‘, असं गुणरत्न सदावर्तेंनी म्हटलंय. 

Published on: Jul 11, 2025 11:20 AM