Harbor Line Disruption : मुंबईत पुन्हा लोकल सेवा कोलमडली, 30 मिनिटे वाहतूक विस्कळीत; कोणत्या स्थानकात प्रवाशांची गर्दीच गर्दी?
मुंबईकरांना हार्बर मार्गावर वाहतूक विस्कळीत झाल्याने मनस्ताप सहन करावा लागला. तांत्रिक बिघाडामुळे वांद्रेकडे जाणारी लोकल वडाळा स्थानकात सुमारे 30 मिनिटे थांबली होती, ज्यामुळे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली होती.
मुंबईत पुन्हा लोकल सेवा कोलमडल्याची माहिती आहे. मुंबईकरांना हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. तांत्रिक बिघाडामुळे वांद्रेकडे जाणारी लोकल वडाळा स्थानकात सुमारे 30 मिनिटे खोळंबली होती. यामुळे हार्बर लाईनवरील सर्व स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती, विशेषतः दुपारच्या वेळेतही गर्दी दिसून आली. माहितीनुसार, वडाळा स्थानकात गोरेगावकडे जाणाऱ्या मार्गिकेवर तांत्रिक बिघाड झाल्याचे दिसून आले आहे. मार्गावरील पॉइंटमध्ये आलेल्या तांत्रिक अडथळ्यामुळे वांद्र्याकडे जाणारी लोकल वडाळा स्थानकात थांबवावी लागली.
Published on: Nov 19, 2025 06:05 PM
