आम्हाला मुदत वाढ मागण्याची गरज नाही- विनायक राऊत असे का म्हणाले, पहा 4 मिनिट 24 हेडलाईन्स

आम्हाला मुदत वाढ मागण्याची गरज नाही- विनायक राऊत असे का म्हणाले, पहा 4 मिनिट 24 हेडलाईन्स

| Updated on: Oct 06, 2022 | 5:56 PM

निवडणूक आयोग धनुष्यबाण चिन्हावर उद्या निर्णय घेण्याची शक्यता आहे.

काल दसरा मेळाव्यात खरी शिवसेना कोणाची यावर जोरदार रणकंदन झाले आहे. त्यानंतर आता निवडणूक आयोग धनुष्यबाण चिन्हावर उद्या निर्णय घेण्याची शक्यता आहे. यादरम्यान निवडणूक आयोगाकडे कागदपत्रं उद्याच जमा करू. आम्हाला मुदत वाढ मागण्याची गरज नाही असे खासदार विनायक राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. तर खरी शिवसेना कोणाची हे शिंदे यांनी कालच्या मेळाव्यात दाखवून दिलं. तर उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्या पेक्षा शिंदेच्या मेळाव्याला गर्दी दुप्पट होती असं फडणवीस म्हणाले. तर अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली. काही जणांची भाषणं अनावश्यक लांबल्याचं पवार म्हणाले.

 

Published on: Oct 06, 2022 05:56 PM