पहा काय झालं दसरा मेळाव्यानंतर कोणी कोणावर टीका केली? अपडेटसाठी पहा 4 मिनिट 24 हेडलाईन्स

पहा काय झालं दसरा मेळाव्यानंतर कोणी कोणावर टीका केली? अपडेटसाठी पहा 4 मिनिट 24 हेडलाईन्स

| Updated on: Oct 06, 2022 | 7:55 PM

भाजपने मोठी स्क्रिप्ट लिहून दिल्यानेच लोक शिंदेंच्या भाषणातून उठून गेल्याचे शिवसेना नेते अंबादास दानवे म्हणाले

उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर 1 लाख शिवसैनिक तर बीकेसीला शिंदेचं भाषण ऐकण्यासाठी 2 लाख कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. असा अंदाज मुंबई पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे. तर खरी शिवसेना कोणाची हे शिंदेंनी दाखवून दिल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. तसेच त्यांनी उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यापेक्षा दुप्पट गर्दी ही शिंदेच्या मेळाव्याला होती असंही म्हटलं आहे. औरंगाबादमधून चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तोफ डागली. त्यांनी शिंदे यांच्यावर, आधी पक्ष फोडला आता घर फोडण्याचे निच काम करत असल्याची टीका केली. तर भाजपने मोठी स्क्रिप्ट लिहून दिल्यानेच लोक शिंदेंच्या भाषणातून उठून गेल्याचे शिवसेना नेते अंबादास दानवे म्हणाले. तर दानवेंच्या वक्तव्यावर शिंदे गटाचे शंभूराज देसाई यांनी पलटवार केला आहे. तर कोल्ह्याला द्राक्ष अंबट अशी अवस्था शिवसेनेची असं देसाई यांनी म्हटलं आहे.

 

Published on: Oct 06, 2022 07:55 PM