‘ताई दिलगिरी व्यक्त करतो’, आरोग्यमंत्र्यांकडून सरोज आहिरे यांच्या तक्रारीची दखल, तात्काळ दिले ‘हे’ आदेश

| Updated on: Feb 27, 2023 | 7:24 PM

VIDEO | सरोज आहिरे यांनी व्यक्त केली खंत अन् आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी घेतली दखल; फोनवर संवाद साधत म्हणाले...

Follow us on

मुंबई : मुंबई येथे आजपासून सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नाशिकच्या देवळाली मतदार संघाच्या आमदार सरोज अहिरे या आपल्या बाळासह विधानभवनात दाखल झाल्या होत्या, मात्र विधानभवनात हिरकणी कक्षाची बकाल अवस्था पाहून त्या नाराज झाल्या आणि त्या परत माघारी फिरल्या. यानंतर आमदार सरोज अहिरे यांनी हिरकणी कक्षाची व्यवस्था असावी म्हणून गेल्या तीन ते चार महिन्यांपूर्वी एक पत्र देखील लिहिले होते. मात्र तरीही कोणतीही व्यवस्था केली नसल्याने सरोज आहिरे यांनी खंत व्यक्त केली आणि लहानग्या बाळाला घेऊन त्या पुन्हा नाशिककडे रवाना झाल्या. यानंतर या प्रकराची दखल राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी घेतली असून त्यांनी तात्काळ आरोग्य यंत्रणेला आदेश दिले. यानंतर तानाजी सावंत यांनी सरोज आहिरे यांना फोन केला आणि फोनवरून संवाद साधत दिलगिरीव्यक्त केली आहे.