Aryan Khan Case | आर्यन खानच्या जामिनावर थोड्याच वेळात सुनावणी, हायकोर्टाबाहेरुन Live

| Updated on: Oct 28, 2021 | 3:05 PM

मुंबई क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणी आर्यन खानच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात आज (28 ऑक्टोबर) म्हणजेच गुरुवारी सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणीचा तिसरा दिवस आहे. आज दुपारी अडीच वाजता सुनावणी होणार आहे.

Follow us on

मुंबई क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणी आर्यन खानच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात आज (28 ऑक्टोबर) म्हणजेच गुरुवारी सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणीचा तिसरा दिवस आहे. आज दुपारी अडीच वाजता सुनावणी होणार आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचा युक्तिवाद बुधवारी पूर्ण झाला आहे. आता एनसीबी यावर आपली बाजू मांडणार आहे. एएसजी अनिल सिंग न्यायालयात एनसीबीची बाजू मांडणार आहेत. बुधवारी कोर्टात त्यांनी सांगितले की, आम्ही एका तासात संपूर्ण मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करू.

दुसरीकडे आर्यन खानला शनिवारपर्यंत जामीन न मिळाल्यास त्याला 17 नोव्हेंबरपर्यंत तुरुंगातच राहावे लागणार आहे. कारण यानंतर न्यायालय दिवाळीच्या सुट्टीवर जाणार आहे. या खटल्यात आर्यनची बाजू मांडताना त्याच्या वकिलाने सांगितले की, एनसीबीने आर्यन खान आणि इतर दोन आरोपी कटात सामील असल्याबद्दल बोलले आहे, परंतु या आरोपावर कधीही अधिकृतपणे पुरावा सादर केलेला नाही. न्यायमूर्ती एनडब्ल्यू सांबरे यांच्या न्यायालयात आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्या जामिनावर बुधवारी दुसऱ्या दिवशीही सुनावणी होऊ शकली नाही.