Baramati News : नीरा डावा कालवा फुटला; बारामतीत पावसाचा हाहाकार, गावं पाण्याखाली गेली, 3 इमारती खचल्या
Baramati Rain News Updates : दिवसभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बारामतीतला नीरा डावा कालवा फुटला आहे. त्यामुळे अनेक शहरात या पावसाचं पाणी शिरलं आहे.
बारामतीत मुसळधार पावसामुळे नीरा डावा कालवा फुटलेला आहे. ढगफुटी सदृश्य पाऊस बारामतीत झाल्याने हा कालवा फुटला आहे. त्यामुळे पावसाचं पाणी अनेक गावात शिरलं आहे. पुर परिस्थिती निर्माण झाली असून बारामतीत 3 इमारती खचल्या असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
नीरा डावा कालवा फुटल्याने बारामतीच्या जळोची गावात पुर स्थिती निर्माण झाली आहे. तर काटेवाडीकडील रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. पिंपळी लिमटेक या ठिकाणी निरा डावा कालव्याला भगदाड पडलं आहे. त्यामुळे कालव्याचे पाणी नागरिकांच्या शेतात आणि घरामध्ये शिरले असून, यामध्ये नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. निरा डावा कालव्याचे आवर्तन सुरूच होते, त्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने कालव्यात पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला यामुळे कालव्याला भगदाड पडल्याची माहिती समोर आली आहे. कालव्याला पिंपळी लिमटेक भागात भगदाड पडल्याची माहिती मिळताच जलसंपदा विभागाने तातडीने नीरा डावा कालवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या पुर परिस्थितीमुळे 3 इमारती खचल्या असल्याची देखील माहिती समोर आली आहे.
