Kalyan Rain : कल्याणमध्ये मुसळधार… खाडीला पूर, तब्येल्यातील म्हशी गोविंदवाडी बायपासवर बांधल्या

Kalyan Rain : कल्याणमध्ये मुसळधार… खाडीला पूर, तब्येल्यातील म्हशी गोविंदवाडी बायपासवर बांधल्या

| Updated on: Sep 29, 2025 | 2:05 PM

कल्याण-डोंबिवलीमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण खाडीला पूर आला आहे. रेतीबंदर परिसरातील तबेल्यांमध्ये पाणी शिरल्याने म्हशींना गोविंदवाडी बायपासवर हलवावे लागले, ज्यामुळे वाहतूक कोंडी झाली. परिस्थिती सुधारल्यावर म्हशींना पुन्हा तबेल्यात नेण्यात आले.

कल्याण-डोंबिवली परिसरात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. कल्याण खाडीच्या पाण्याची पातळी वाढल्याने खाडीकिनारी असलेल्या वस्त्यांमध्ये तसेच रेतीबंदर परिसरातील म्हशींच्या तबेल्यांमध्ये पाणी शिरले. यामुळे म्हशींना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावे लागले. पूरस्थितीमुळे रेतीबंदर येथील म्हशींचे तबेले पाण्याने भरले असल्याने त्या तब्येल्यातील गायी-म्हशींना गोविंदवाडी बायपासवर बांधून ठेवण्यात आले होते. यामुळे बायपासवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

पाणी ओसरल्यानंतर, गोविंदवाडी बायपासवर सुरक्षित ठेवलेल्या म्हशींना पुन्हा त्यांच्या तबेल्यात हलवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यपालांना पत्र पाठवून विशेष अधिवेशनाची मागणी केली आहे. अतिवृष्टी आणि शेतकरी नुकसानीवर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी या अधिवेशनात चर्चा व्हावी, अशी त्यांची मागणी आहे.

Published on: Sep 29, 2025 02:05 PM