हिंदी सक्तीचा मुद्दा पुन्हा पेटला, मनसे आक्रमक, भाजपला गंभीर इशारा

हिंदी सक्तीचा मुद्दा पुन्हा पेटला, मनसे आक्रमक, भाजपला गंभीर इशारा

| Updated on: Jan 13, 2026 | 4:10 PM

नवी मुंबई महानगरपालिकेच्या जाहीरनाम्यात मराठी बरोबर हींदी भाषा सक्ती असेल असं म्हंटलं गेलंय. याचं उत्तर भाजपने दिलं पाहिजे. 'या जाहीरनाम्याची आम्ही होळी करायची की, हा जाहीरनामा फेकून द्यायचा का?'

महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप छुप्या पद्धतीने परत एकदा हिंदी भाषा सक्ती करू इच्छिते का? असा सवाल मनसे नेते गजानन काळे यांनी विरोधकांना केलाय. महाराष्ट्र राज्य सरकारने हिंदी भाषा सक्तीचा निर्णय काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र आणि मराठी माणसावर लादण्याचा प्रयत्न केला होता. याला मराठी माणसांनी विरोध देखील केला होता. याच विषयामुळे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आणि सरकारने हा निर्णय मागे घेतला. हिंदी भाषा सक्ती नकोच असा प्रतिसाद लोकांनी दिला असताना, नवी मुंबई महानगरपालिकेच्या जाहीरनाम्यात मराठी बरोबर हींदी भाषा सक्ती असेल असं म्हंटलं गेलंय. याचं उत्तर भाजपने दिलं पाहिजे. ‘या जाहीरनाम्याची आम्ही होळी करायची की, हा जाहीरनामा फेकून द्यायचा का?’ याचं उत्तर भाजपने दिलं पाहिजे. येणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत 15 तारखेला हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाबद्दल, प्रत्येक मराठी माणूस भाजपच्या विरोधात मतदान करेल आणि ठाकरे बंधूंचे शिलेदार महापालिकेत असतील असा ठाम विश्वास गजानन काळे यांनी व्यक्त केला आहे.

Published on: Jan 13, 2026 04:10 PM