Hindustani Bhau : जेवता ना तुम्ही, XX तर खात नाही ना? माधुरी हत्तीण प्रकरणात हिंदुस्थानी भाऊची उडी अन् कोल्हापूरकरांना डिवचलं, ‘तो’ VIDEO व्हायरल
'ज्याची सुपारी घेतली तो तुझा बाप असेल आम्हा कोल्हापूरकरांचा नाही', असं प्रत्युत्तर हिंदुस्थानी भाऊने केलेल्या व्हिडीओवर देण्यात आलंय. नेमकं काय आहे प्रकरण? बघा
कोल्हापूरच्या माधुरी हत्तीणीच्या वादामध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हिंदुस्थानी भाऊने उडी घेतल्याने मोठा वाद निर्माण झालाय. या प्रकरणाच्या एका व्हिडीओमध्ये त्याने केलेल्या भाषेवरून संताप व्यक्त करण्यात येतोय. माधुरी हत्तीसंदर्भात सुरू असलेल्या प्रकरणासंदर्भात एक व्हिडिओ करत हिंदुस्थानी भाऊने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला. यामध्ये त्याने अंबानींचं कौतुक करत माधुरीला पुन्हा कोल्हापुरात आणण्याची मागणी करणाऱ्यांवर आक्षेपार्ह शब्दात भाष्य केले.
अंबानींवर टीका करणाऱ्यांवर निशाणा साधताना हिंदुस्थानी भाऊ असं म्हणतोय की, ‘ना अनंत अंबानी माझं घर चालवत ना तुमचं. अनंत अंबानीची इज्जत मी यासाठी करतो की, तो कट्टर सनातनी आहे. 200 च्या वर त्याच्याकडे हत्ती आहे. जगभरातील प्राणी आहेत. त्याला एका हत्तीशी काय देणं-घेणं आहे रे..अरे थोडी अक्कल लावा रे.. जेवताना तुम्ही XXX तर नाही खात नं? थोडं डोकं लावला.. कोणच्याही आहारी जाऊ नका’, असं हिंदुस्थानी भाऊ बोललाय. यावरूनच कोल्हापूरकरांचा संताप पाहायला मिळतोय.
