Indrajeet Sawant Call : ‘तुम्हाला वाटतंय महाराष्ट्र माझा पण ब्राम्हणांची औकात…’, शिवीगाळ करत इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंतांना जीवे मारण्याची धमकी
इंद्रजीत सावंत यांनी स्वतः हा आरोप केला आहे. तर प्रशांत कोरटकर या नावाच्या व्यक्तीकडून इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. धमकी देण्यात आल्याचं संभाषण इंद्रजीत सावंत यांच्याकडून सोशल मीडियाकडून शेअर करण्यात आलं आहे.
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याच्या धमकी देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. इंद्रजीत सावंत यांनी स्वतः हा आरोप केला आहे. तर प्रशांत कोरटकर या नावाच्या व्यक्तीकडून इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. धमकी देण्यात आल्याचं संभाषण इंद्रजीत सावंत यांच्याकडून सोशल मीडियाकडून शेअर करण्यात आलं आहे. मात्र आता इंद्रजीत सावंत यांचे आरोप प्रशांत कोरटकर या व्यक्तीकडून फेटाळण्यात आले आहेत. ‘इंद्रजीत सावंत यांना ओळखत नाही’, असं स्पष्टपणे प्रशांत कोरटकर या व्यक्तीने म्हटलं असून कोणीतरी खोडसाळपणा केला असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, याप्रकरणी नागपूर पोलीस आणि सायबर पोलीस यांच्याकडे तक्रार दाखल करणार असल्याचे प्रशांत कोरटकर यांच्याकडून सांगण्यात येत आहे. ‘तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना तिथे येतो… ब्राम्हणांची ताकद कमी समजू नका.. लक्षात घ्या… तुम्हाला वाटत असेल मराठमोळा महाराष्ट्र माझा.. ब्राम्हणांची ताकद काय हे महाराजांच्या अष्टप्रधानात चेक करा कोण ब्राम्हण होतं ते.. स्वतःची टीआरपी वाढवण्यासाठी काही करू नका. ब्राम्हणांची औकात काय आहे हे दाखवू’, असं म्हणत या कॉल रेकॉर्डमध्ये इंद्रजीत सावंत यांच्यावर ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा आरोप करण्यात आला. दरम्यान, व्हायरल होणाऱ्या या ऑडिओची टीव्ही ९ मराठी पुष्टी करत नाही.
