अजित पवारांना मुख्यमंत्री करायचे असेल तर… हसन मुश्रीफ यांनी दिला कानमंत्र

| Updated on: Nov 06, 2023 | 11:59 PM

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडे आल्यामुळे पवार गटाची पीछेहाट झाली. आम्हाला सुद्धा वाटतंय आमचा नेता मुख्यमंत्री व्हावा. मोदी हे पुन्हा पंतप्रधान होतील हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. पहिल्यापासून कागल, चंदगड, भुदरगडमध्ये राष्ट्रवादीची ताकद आहे.

Follow us on

कोल्हापूर | 6 नोव्हेंबर 2023 : पहिल्यापासून कागल, चंदगड, भुदरगडमध्ये राष्ट्रवादीची ताकद आहे. त्यामुळे तिथं आमचे उमेदवार निवडून आले आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडे आल्यामुळे पवार गटाची पीछेहाट झाली आहे असं म्हणता येईल. अजित पवारांना मुख्यमंत्री करायचे असेल तर आम्ही सुद्धा जास्तीत जास्त जागा निवडून आणणे गरजेचे आहे, असे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटते आपला नेता मुख्यमंत्री व्हावा. आम्हाला सुद्धा वाटतंय आमचा नेता मुख्यमंत्री व्हावा असेही ते म्हणाले. 600 पेक्षा जास्त ग्रामपंचायतीवर महायुतीची सत्ता आली आहे. मोदी हे पुन्हा पंतप्रधान होतील हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. महाडिक आणि सतेज गटाचे एकत्र पॅनेल आले ही गोष्ट चांगलीच आहे. पण, त्यांच्या पॅनेलचा धुव्वा उडला आहे. त्यांचा पराभव झाला असला तरी ते एकत्र आलेत ही सुद्धा चांगली गोष्ट आहे असा टोला त्यांनी लगावला.