Chandrakant Patil | हिंसाचार थांबवला तर मविआची मतं जातील : चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil | हिंसाचार थांबवला तर मविआची मतं जातील : चंद्रकांत पाटील

| Edited By: | Updated on: Nov 13, 2021 | 5:36 PM

अमरावतीत खुलेआम दंगल झाली. माजी मंत्र्यांचे ऑफिस फोडले, पण कारवाई कोण करेल. पोलिसांनी दंडुका उगारला, तर त्यांची मते जातील, अशी टीका शनिवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

अमरावतीत खुलेआम दंगल झाली. माजी मंत्र्यांचे ऑफिस फोडले, पण कारवाई कोण करेल. पोलिसांनी दंडुका उगारला, तर त्यांची मते जातील, अशी टीका शनिवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. ते नाशिकमध्ये विकासकामांचे उद्घाटन झाल्यानंतर बोलत होते. पाटील म्हणाले की, काम राहिली असतील, तर नगरसेवकांच्या मागे लागून करून घ्या. पण विकासकामे सुरू ठेवायचे असतील, तर पुन्हा सत्ता द्या. मोदीजींना मुख्यमंत्री म्हणून देखील 15 वर्षांचा वेळ मिळाला. त्यामुळे गुजरातचा विकास झाला. आता पाहा देशात तिसऱ्या टर्मला भाजप 418 खासदार निवडूण आणणार. महाराष्ट्रात जसं मधेच सरकार गेलं आणि आपण पश्चाताप करतो, तसं होऊ देऊ नका. देवेंद्रजीचे काम बघून लोकांनी मतदान केलं, पण गद्दारी झाली, असा आरोप त्यांनी केला.