Imran Khan : इमरान खान जेलमधून सुटणार? तब्बल 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून होतेय एकच मागणी

Imran Khan : इमरान खान जेलमधून सुटणार? तब्बल 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून होतेय एकच मागणी

| Updated on: May 02, 2025 | 7:28 PM

इमरान खान यांच्या पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इस्लामचे कार्यकर्ते आणि समर्थक खान यांच्या सुटकेची मागणी करत आहेत. तर दुसरीकडे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना त्यांच्या पदावरून हटवण्याची मागणी सोशल मीडियावर होतेय.

पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय कारवाईची धडकी पाकिस्तानच्या मनात भरली आहे. अशातच भारतासोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानमध्ये इमरान खानच्या सुटकेची मागणी जोर धरताना दिसत आहे. इमरान खानचे समर्थक खान यांच्या सुटकेची मागणी करताना दिसताय. माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या समर्थकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर एक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेद्वारे त्यांचे समर्थक खान यांना तुरुंगातून सोडण्यात यावे, अशी मागणी करत आहे. यासह समर्थक असेही म्हणताय की, पहलगाम हल्ला पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी रचला होता. पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांच्या राजीनाम्याची मागणी सोशल मीडियावरही जोर धरत आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या सुटकेची मागणी सोशल मीडियावर जोर धरत असताना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर इमरान खानच्या सुटकेची मागणी करणारे अनेक हॅशटॅग देखील ट्रेंड होत आहेत. जसे की, #ReleaseKhanForPakistan आणि #FreeImranKhan या हॅशटॅग्जवर लाखो पोस्ट सध्या व्हायरल होतायत

Published on: May 02, 2025 07:27 PM