Mumbai Rain : दिवस उजाडला असूनही काळेकुट्ट ढग अन् विजांचा कडकडाट, मुंबई पहाटेपासूनच सतंतधार
जून महिना उजाडला नसला तरी पावसाने सर्वत्र हजेरी लावली आहे. त्यामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे. बघा नेमकी कशी आहे परिस्थिती?
मुंबईत काल संध्याकाळपासून झोडपणाऱ्या पावसाची आज पहाटेपासूनच पुन्हा एकदा हजेरी पाहायला मिळत आहे. काल झालेल्या मुंबईतील मुसळधार पावसामुळे जे.जे. उड्डाणपुलावर पाणी साचलं होतं. तर मुंबईतील अनेक भागात पावसाची संततधार कायम आहे. तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळताना दिसताय. केरळ राज्यात दाखल झालेल्या पावसानंतर महाराष्ट्रात कधी मान्सून दाखल होणार याची प्रतिक्षा असताना तळ कोकणात काल मान्सूनने हजेरी लावली आहे. येत्या दोन ते तीन दिवसात मुंबईसह महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला होता. मात्र त्यापूर्वीच मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दरम्यान, मुंबई आणि मुंबई उपनगरात सुरू असलेल्या पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर देखील परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई लोकल सेवा ही दहा ते पंधरा मिनिटं उशिराने सुरू आहे.
