Special Report | नवाब मलिकांच्या मुलाचं 26/11च्या आरोपीशी कनेक्शन ?

Special Report | नवाब मलिकांच्या मुलाचं 26/11च्या आरोपीशी कनेक्शन ?

| Edited By: | Updated on: Nov 03, 2021 | 9:53 PM

बुधवारी सकाळी ट्वीट करत मलिकांनी नाव न घेता भाजप नेत्यांना दिवाळीच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात येत्या रविवारी मोठा खुलासा करण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. नवाब मलिकांनी बुधवारी ट्वीट करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबई : मुंबई ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला एनसीबीने अटक केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी आरोप आणि खळबळन खुलासा करण्याची मालिका सुरुच ठेवलीय. आधी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि आता भाजप नेत्यांवर मलिक आरोपांच्या फैरी झाडत आहेत. बुधवारी सकाळी ट्वीट करत मलिकांनी नाव न घेता भाजप नेत्यांना दिवाळीच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात येत्या रविवारी मोठा खुलासा करण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. नवाब मलिकांनी बुधवारी ट्वीट करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी एका नव्या खुलाशाचा सूचक इशाराही या ट्वीटमधून दिला आहे. “शुभ दीपावली. तुम्हा सर्वांची दिवाळी मंगलमय होवो. हॉटेल ललितमध्ये अनेक रहस्य लपलेली आहेत. तेव्हा भेटूया रविवारी”, असं ट्वीट मलिक यांनी केलं आहे. मलिकांच्या या ट्वीटनंतर रविवारी कोणता धमका होणार? कोणते फटाके किंवा बॉम्ब फुटणार? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.