नाशिकमध्ये शेतकऱ्यांचे शोले स्टाईल आंदोलन, वीजेच्या हायटेन्शन टॉवरवर चढून निषेध व्यक्त

नाशिकमध्ये शेतकऱ्यांचे शोले स्टाईल आंदोलन, वीजेच्या हायटेन्शन टॉवरवर चढून निषेध व्यक्त

| Edited By: | Updated on: Jan 30, 2022 | 2:54 PM

शेतकऱ्यांनी थेट उच्च दाब वाहिनीच्या टॉवरवर चढूनच ‘शोले स्टाईल’ आंदोलन केले आहे. राज्यात सर्वत्रच अशा प्रकारे विद्युत पुरवठा खंडीत केला जात आहे.

नाशिक: वीजपुरवठा खंडीत करताना शेतकऱ्यांना पूर्वसूचना देणे हा नियम असतनाही थेट वीजपूरवठाच खंडीत केला जात आहे. महावितरणच्या या कारभारामुळे त्रस्त असलेल्या सय्यद पिंप्री येथील (Farmer) शेतकऱ्यांनी थेट उच्च दाब वाहिनीच्या टॉवरवर चढूनच ‘शोले स्टाईल’ आंदोलन केले आहे. राज्यात सर्वत्रच अशा प्रकारे विद्युत पुरवठा खंडीत केला जात आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे तर नुकसान होतच आहे पण जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न उपस्थित होत आहे.