12 Spies Arrested : घरका भेदी लंका ढाये! 11 दिवसांत पकडले 12 हेर, पाकिस्तानला पुरवत होते देशातील सगळी माहिती

12 Spies Arrested : घरका भेदी लंका ढाये! 11 दिवसांत पकडले 12 हेर, पाकिस्तानला पुरवत होते देशातील सगळी माहिती

| Updated on: May 19, 2025 | 5:29 PM

Pakistan spies arrested in India : भारतात राहून पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या 12 हेरांना हरियाणा आणि पंजाबच्या वेगवेगळ्या भागांमधून अटक करण्यात आलेली आहे.

मागच्या 11 दिवसात हरियाणा आणि पंजाबमधून 12 हेर पकडण्यात आलेले आहेत. या 12 जणांचा पाकिस्तानच्या दुटवासाशी संबंध आहे. भारत – पाकिस्तानमधील तणावानंतर भारतातल्या अनेक पाकिस्तानी हेरांवर कारवाई करण्यात आलेली आहे.

या पकडलेल्या 12 हेरांमध्ये ज्योती मल्होत्राचा समावेश आहे. ज्योती मल्होत्राने 3 वेळा पाकिस्तानला भेट दिलेली आहे. पाकिस्तानी उच्च आयुक्तालयातील कर्मचारी दानिशशी तिची ओळख आहे. दानिशच्या माध्यमातून पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या संपर्कात आली. तिने पाकिस्तानसोबत संवेदनशील माहिती देखील शेअर केल्याचा आरोप आहे. त्याचबरोबर गजाला उर्फ गजाला खातून, देवेंद्र सिंग, नोमान इलाही, अरमान, तारीफ, मोहम्मद मूर्तजा आली, शहजाद, कारणबीर सिंग, सुखप्रीत सिंग, हरकिरत सिंग यांना देखील भारतात पाकिस्तानसाथी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आलेलं आहे.

Published on: May 19, 2025 05:29 PM