Pakistan : भारतासोबत युद्ध झालं तर अवघ्या 100 तासांत पाकिस्तानचे होणार 5 तुकडे, कारण….

Pakistan : भारतासोबत युद्ध झालं तर अवघ्या 100 तासांत पाकिस्तानचे होणार 5 तुकडे, कारण….

| Updated on: May 06, 2025 | 10:11 AM

पहलगाम हल्ल्याच्या बदला घेणार, असं भारताने आधीच जाहीर केले आहे. भारताच्या २६ देशवासीयांच्या बलिदानाची मोठी किंमत पाकिस्तानला मोजावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान आणि क्षेपणास्त्र शक्ती पाकिस्तानवर हल्ला करण्यास सज्ज आहेत.

भारत आणि पाकिस्तानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताकडून होणाऱ्या हल्ल्यांपासून वाचण्यासाठी पाकिस्तानी सैन्य शक्तीचा पोकळ देखावा करत असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण पाकिस्तानकडे फक्त 100 तास पुरेल इतकाच शस्त्रसाठा शिल्लक असल्याची मोठी माहिती समोर येत आहे. जर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालंच तर अवघ्या 100 तासांत पाकिस्तानचे पाच तुकडे होणार असल्याचे सांगितले जात आहे. असे असले तरी पाकिस्तानकडून भारताला पोकळ धमक्या देणं सुरूच आहे. दरम्यान, पाकिस्तानने दोन दिवसांत दोन क्षेपणास्त्रांची चाचणी केली आहे. प्रथम अब्दाली आणि नंतर फतह क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. तर भारताने आपलं प्रगत क्षेपणास्त्र ब्रह्मोसला युद्धासठी तैनात केले आहे. त्यामुळे इस्लामाबादमध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे.

आता युद्धजन्य परिस्थितीत भारत आपली पूर्व तयारी करत असताना पाकिस्तानला धडकी भरली असून त्यांच्यात चिंतेचं वातावरण आहे. कारण म्हणजे पाकिस्तानी सैन्याकडे 100 तासांपेक्षा कमी दारूगोळा शिल्लक आहे. याचा अर्थ असा की जर युद्ध झाले तर 100 तासांच्या आत पाकिस्तानचे 5 तुकडे होऊ शकतात.

Published on: May 06, 2025 10:11 AM