India – Pakistan War : जल, थल, आकाश! भारताकडून पाकिस्तानवर जोरदार हल्ला सुरूच
भारताकडून दहशतवाद्यांना टार्गेट केलं जाण्याची भिती पाकिस्तानला असल्याने त्यांनी सर्व दहशतवाद्यांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे.
भारताने सलाल धरणाचे दरवाजे उघडलेले आहेत. त्यामुळे पाकिस्तानमध्ये पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानवर जल, थल, आणि आकाश या सर्व मार्गांनी भारताकडून आक्रमक झालेलं आहे. त्यामुळे पाकिस्तानची चांगलीच घाबरगुंडी उडालेली आहे. काल रात्री भेदरलेल्या पाकिस्तानने भारताच्या सीमावर्ती भागांना निशाणा बनवत ड्रोन आणि मिसाईल हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रयत्न भारतीय लष्कराने पुरता हाणून पाडला आहे. त्यानंतर भारतीय नौदलाच्या आयएनएस विक्रांतने कराची बंदरावर सर्वात मोठा हल्ला केला.
दरम्यान या सगळ्यात पाकिस्तानला सामान्य नागरिकांपेक्षा दहशतवाद्यांची जास्त काळजी असल्याचं बघायला मिळालं आहे. भारताकडून दहशतवाद्यांना टार्गेट केलं जाण्याची भीती पाकला असल्याने पाकिस्तानने सगळ्या दहशतवाद्यांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे.
Published on: May 09, 2025 11:04 AM
