Dream11 & My11Circle Ban :  ड्रीम 11 किंवा माय 11 सर्कल काय आता तर ऑनलाईन रमीही खेळता येणार नाही, कारण…

Dream11 & My11Circle Ban : ड्रीम 11 किंवा माय 11 सर्कल काय आता तर ऑनलाईन रमीही खेळता येणार नाही, कारण…

| Updated on: Aug 22, 2025 | 11:09 AM

क्रिकेटचा सामना सुरू झाला की तरुणाई मोठ्या संख्येने ड्रीम इलेव्हन खेळत असते. यादरम्यान, यासारख्या ऑनलाईन अ‍ॅपवरचा सर्वाधिक वापर होताना दिसतो. पण याच गेमिंगला आता आळा बसणार आहे कारण संसदेमध्ये ऑनलाईन गेमिंग बिल पास झालंय.

ड्रीम इलेव्हन आणि माय इलेव्हन सर्कलवर आता टीम बनवून ऑनलाईन गेमिंग खेळता येणार की नाही यावरून सवाल उपस्थित झाला. त्याचं कारण म्हणजे केंद्र सरकारनं ऑनलाईन गेमिंग बिल लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही पारित केलं. विशेष म्हणजे ड्रीम इलेव्हन किंवा माय इलेव्हनच नाही तर ऑनलाईन रमीही खेळता येणार नाही.

प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग बिल, 2025 लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही पास झालं. बिल पास झाल्यामुळे ऑनलाईन बेटिंग आणि पैशाच्या खेळावर पूर्णपणे बंदी येणार आहे. लोकांना चुकीच्या सवयी आणि आर्थिक नुकसानीपासून वाचवण्यासाठी हे बिल सरकारने आणले. याचा परिणाम क्रिकेट इंडस्ट्रीवर होणार आहे. क्रिकेटचे मुख्य स्पॉन्सर्स ऑनलाईन क्रिकेट गेम आहेत. या बिलामुळे क्रिकेट इंडस्ट्रीचं जवळपास 17 हजार कोटींचं नुकसान होण्याची शक्यता आहे. यात जर कुणीही ऑनलाईन मनी गेम सर्व्हिस ऑफर करत असेल तर त्याला तीन वर्षाची शिक्षा आणि एक कोटीपर्यंत दंड लागू शकतो. गेमची जाहिरात करणाऱ्याला दोन वर्षाची शिक्षा आणि 50 लाखांपर्यंतचा दंड ठोठावण्यात येईल. पण गेम खेळणाऱ्याला कोणत्याही प्रकारची शिक्षा होणार नसून त्याला बिलमध्ये पीडित मानण्यात आलंय.

Published on: Aug 22, 2025 11:09 AM