Dadar Kabutarkhana : तर आम्ही शस्त्र उचलू, आम्ही कोर्टाला मानणार नाही! आमच्या धर्माच्या विरोधात आलात…जैन मुनींची चिथावणी ऐका

Dadar Kabutarkhana : तर आम्ही शस्त्र उचलू, आम्ही कोर्टाला मानणार नाही! आमच्या धर्माच्या विरोधात आलात…जैन मुनींची चिथावणी ऐका

| Updated on: Aug 11, 2025 | 11:10 AM

वेळ आली तर कबुतरांसाठी आम्ही शस्त्र उचलू कोर्टाने विरोधात निकाल दिला तर आम्ही कोर्टालाही मानणार नाही अशी वक्तव्य एका जैन मुनीनी केली आहेत. कबुतरांमुळे होणाऱ्या अशांततेच्या विकारावर कारवाईचे आदेश कोर्टाने दिले होते त्याची अंमलबजावणी महानगरपालिकेने केली त्यामुळे जैन मुनी नेमकं कोणाविरोधात शस्त्र हाती घेण्याची भाषा करतायत हा सुद्धा प्रश्न आहे.

कबुतरखानावरून जैन मुनी आता थेट कोर्टालाच आव्हान देऊ लागले आहेत आमच्या धर्माविरोधात निकाल आला तर कोर्टालाही आम्ही मानणार नाही वेळ पडली तर हाती शस्त्रही घेऊ अशी विधाने आता होऊ लागली आहेत. अहिंसा मानणाऱ्या जैन धर्मातले मुनीच आता एका बाजूला अहिंसेचे दाखले देतानाच दुसऱ्याच शब्दात ते शस्त्र उचलण्याची ही भाषा करतायत. नुकताच संकलेचा नावाच्या एका व्यक्तीने गाडीच्या टपावर दाणे टाकून कबुतर जमवले होते. त्याचवेळी कोर्ट आणि न्यायाधीशांना त्यांनी जबाब विचारला होता त्यानंतर आज जैन मुनीनी धर्माविरोधात निकाल आला तर थेट कोर्टालाच मानण्यास नकार दिला.

या महाशय जैन मनींना कोर्टात नेमकं काय म्हटलंय हे तरी माहिती आहे की नाही याबद्दलही शाशंकता आहे. गेल्या सुनावणीत हायकोर्टाने कबुतरखाण्यावरील बंदीचा निर्णय कायम ठेवला. आमच्यासाठी नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं आहे असं कोर्टाने म्हटलं होत तर आम्ही दिलेल्या आदेशाचा कोणीही अवमान करू नये कोर्टाच्या आदेशावर हरकत असेल तर दाद मागण्याचे पर्याय असल्याचे कोर्टाने म्हटले आहे मात्र जैन मुनी कोर्टाचा वेगळाच निकाल सांगतायत.

Published on: Aug 11, 2025 11:10 AM