Jalna Heavy Rain : बापरे.. हा रस्ता की नदी! जालन्यात अतिवृष्टी, रस्ता अन् शेती पाण्यात, बघा ड्रोन व्ह्यू

Jalna Heavy Rain : बापरे.. हा रस्ता की नदी! जालन्यात अतिवृष्टी, रस्ता अन् शेती पाण्यात, बघा ड्रोन व्ह्यू

| Updated on: Sep 16, 2025 | 12:14 PM

जालना शहरात मुसळधार पावसाने गेल्या काही तासात हाहाकार माजवला आहे. शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले असून, रस्ते नद्यांसारखे भरले आहेत. अनेक घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. ड्रोन कॅमेऱ्याने शहरातील पूरग्रस्त भागांचे व्हिडिओ व्हायरल होत आहे. पावसाचा जोर इतका तीव्र आहे की, ब्रिजपर्यंत पाणी पोहोचले आहे आणि नदीनाले दुधडी भरून वाहत आहेत. या […]

जालना शहरात मुसळधार पावसाने गेल्या काही तासात हाहाकार माजवला आहे. शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले असून, रस्ते नद्यांसारखे भरले आहेत. अनेक घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. ड्रोन कॅमेऱ्याने शहरातील पूरग्रस्त भागांचे व्हिडिओ व्हायरल होत आहे. पावसाचा जोर इतका तीव्र आहे की, ब्रिजपर्यंत पाणी पोहोचले आहे आणि नदीनाले दुधडी भरून वाहत आहेत. या अतिवृष्टीमुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. निवारा शोधण्यासाठी अनेकांना घरातून बाहेर पडावे लागले आहे. जालना शहराला मुसळधार पावसाने झोडपल्यानंतर पुराच्या पाण्याने शहराला अक्षरशः वेढा घातलेला आहे. बघा ड्रोन व्ह्यू.

Published on: Sep 16, 2025 12:14 PM