Delhi Jantar- Mantar CJP Andolan : सीजेपी आंदोलनाआधी दिल्लीचं छावणीत रूपांतर; जंतर-मंतरवर BSF, CRPF अन्….

Delhi Jantar- Mantar CJP Andolan : सीजेपी आंदोलनाआधी दिल्लीचं छावणीत रूपांतर; जंतर-मंतरवर BSF, CRPF अन्….

| Updated on: Oct 10, 2026 | 8:50 AM

दिल्लीतील जंतरमंतर परिसरात सीजेपी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीएसएफ, दिल्ली पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. या भागाला छावणीचे स्वरूप आले आहे. इंटरनेट सेवा, मेट्रो स्टेशन आणि दिल्लीकडे येणाऱ्या काही ट्रेनही बंद करण्यात आल्या आहेत. कलम १६३ लागू असल्याने पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे.

राजधानी दिल्लीतील जंतरमंतर परिसर सीजेपी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छावणीत बदलला आहे. येथे सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) जवान मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्यासोबतच दिल्ली पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) जवानही सुरक्षेसाठी हजर आहेत, ज्यामुळे परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

या आंदोलनामुळे प्रशासनाने काही महत्त्वाचे निर्बंध लादले आहेत. जंतरमंतर परिसरातील सुमारे चार किलोमीटरपर्यंतची इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. तसेच, अनेक मेट्रो स्टेशन बंद ठेवण्यात आले असून दिल्लीकडे येणाऱ्या काही रेल्वे सेवाही थांबवण्यात आल्या आहेत.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या संपूर्ण परिसरात बीएनएस कलम १६३ लागू करण्यात आले आहे. यामुळे पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा आदेश दिल्ली पोलिसांनी दिला आहे. शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी हे सर्व उपाय योजण्यात आले आहेत. टीव्ही ९ मराठीसाठी गजानन माटे, नवी दिल्ली.

Published on: Oct 10, 2026 8:49 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us