Javed Akhtar : मला त्यांची लाज वाटते, माझी मान… भारतात तालिबानी मंत्र्याचा सन्मान अन् जावेद अख्तर संतापले
प्रख्यात गीतकार,लेखक जावेद अख्तर यांनी तालिबानच्या परराष्ट्र मंत्र्याच्या भारत दौऱ्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आमीर खान मुत्ताकी यांच्या स्वागतावर संताप व्यक्त करत अख्तर म्हणाले की, जगातील सर्वात क्रूर दहशतवादी संघटनेच्या प्रतिनिधीला सन्मान पाहून माझी मान शरमेने झुकली. मुलींच्या शिक्षणावर बंदी घालणाऱ्यांचे स्वागत लाजिरवाणे असल्याचे त्यांनी म्हटले.
प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी तालिबान सरकारच्या परराष्ट्र मंत्र्याच्या भारत दौऱ्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. तालिबानचे परराष्ट्र मंत्री आमीर खान मुत्ताकी यांच्या भारतामधील स्वागतामुळे जावेद अख्तर यांनी आपली नाराजी जाहीर केली. जावेद अख्तर यांनी स्पष्ट शब्दांत टीका केली आहे की, “तालिबानी नेत्याला भारतात सन्मान मिळाल्याने माझी मान शरमेने झुकली.”
त्यांनी पुढे म्हटले आहे की, “जगातील सर्वात क्रूर दहशतवादी संघटना असलेल्या तालिबानच्या प्रतिनिधीला भारताने दिलेल्या सन्मानामुळे माझी मान शरमेने खाली गेली.” मुलींच्या शिक्षणावर बंदी घालणाऱ्यांपैकी एक असलेल्या तालिबानच्या प्रतिनिधीचे इस्लामिक हिरो म्हणून स्वागत करणाऱ्यांची लाज वाटत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. माझ्या भारतीय बंधू आणि भगिनींनो, आपल्यासोबत हे काय घडत आहे? असा प्रश्न विचारत अख्तर यांनी या घटनेबद्दलचे आपले दुःख आणि नाराजी व्यक्त केली.
