भाजपात निष्ठावंत नाराज? जयंत पाटील म्हणतात, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्यांना…”!

| Updated on: Aug 03, 2023 | 2:54 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. "भाजपमध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलण्याचे काम जोरात सुरू आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या लोकांना पहिल्या रांगेत बसवले जाते.

Follow us on

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर टीका केली आहे. “भाजपमध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलण्याचे काम जोरात सुरू आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या लोकांना पहिल्या रांगेत बसवले जाते. आयुष्यभर भाजपची निष्ठा वाहिली त्यांना मात्र डावलले जात आहे, तर त्यांचे अनेक नेते, कार्यकर्ते खासगीमध्ये आमच्याकडे दुःख व्यक्त करतात”, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. तसेच, “राज्यांचे अधिकार गोठविण्याचे काम अप्रत्यक्षपणे केंद्र सरकार करत आहे. राज्यांचे अधिकार कमी करण्याचे काम केंद्रातील मंडळी करत आहे. भाजपात दबाव टाकण्याची पद्धत सुरू झाल्याचे मी ऐकतोय, पण माझ्या बाबतीत तसं काही नाही. हा त्रास कशासाठी चालू आहे, हे सर्वांना माहित आहे. अन्याय होऊ नये अशी अपेक्षा असते, मात्र पक्षाला हा त्रास सहन करावा लागतो”, असे जयंत पाटील म्हणाले.  ते पुढे म्हणाले की, गजानन किर्तीकर हे आता सरकारमध्ये आहे. त्यामुळे निदान सापत्न तरी वागणूक मिळते. सरकारमध्ये नसल्यावर तीही वागणूक मिळणार नाही, असा टोला पाटील यांनी लगावला.