Video : चंद्रकांत पाटील हिमालयात गेले तर मीसुद्धा त्यांच्यासोबत जाईन- जयंत पाटील

Video : चंद्रकांत पाटील हिमालयात गेले तर मीसुद्धा त्यांच्यासोबत जाईन- जयंत पाटील

| Updated on: Apr 16, 2022 | 5:34 PM

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव (Jayashri Jadhav) यांचा विजय झाल्यानंतर मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) मीडियाशी बोलत होते.  पराभव एका मताने केला काय आणि हजाराने केला काय, पराभव हा पराभव असतो. चंद्रकांत दादांना (chandrakant patil) हाही मतदार संघ सोडावा लागेल असं वाटतंय. इतकी आपुलकी इथे दिसतेय. ही संधी […]

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव (Jayashri Jadhav) यांचा विजय झाल्यानंतर मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) मीडियाशी बोलत होते.  पराभव एका मताने केला काय आणि हजाराने केला काय, पराभव हा पराभव असतो. चंद्रकांत दादांना (chandrakant patil) हाही मतदार संघ सोडावा लागेल असं वाटतंय. इतकी आपुलकी इथे दिसतेय. ही संधी होती निवडणुकीला उभं राहायची, असं सांगतानाच चंद्रकांतदादांनी खरोखरच हिमालयात जावं. मी त्यांच्याबरोबर जाऊन येईल. काय कसं? कुठं ते बघायला. दादांचे आणि माझे सलोख्याचे संबंध आहेत. दादा जाणार असतील तर मीही जाईन. माझी ही इच्छा आहे हिमालयात जाण्याची, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला.