Jitendra Awhad : आम्ही काय वेडे आहोत? पोलीसच त्याला तंबाखू मळून देत होते, आव्हाड आक्रमक; विधिमंडळ परिसरात रात्री घडलं काय?

Jitendra Awhad : आम्ही काय वेडे आहोत? पोलीसच त्याला तंबाखू मळून देत होते, आव्हाड आक्रमक; विधिमंडळ परिसरात रात्री घडलं काय?

| Updated on: Jul 18, 2025 | 8:42 AM

विधानभवन परिसरात तासभर चाललेल्या राड्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत धरपकड केली. यावेळी आव्हाडांनी पोलिसांच्या गाडी समोर ठिय्या देत पोलिसांची गाडी रोखून धरली. यानंतर पोलिसांनी आव्हाडांना खेचत बाहेर ओढलं.

विधिमंडळ परिसरात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाचा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र या हाणामारीने वेगळं वळण घेतलं आहे. काल १७ जुलै रोजी संध्याकाळी गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले आणि जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख यांच्यात बाचाबाची झाली. याच दिवशी रात्री उशिरा बारा ते दीडवाजेदरम्यान विधिमंडळ परिसरात तुफान राडा झाल्याचेही पाहायला मिळाले. आव्हाडांचा नितीश देशमुख याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आव्हाड आक्रमक झाले आणि त्यांनी पोलिसांच्या गाडीसमोरच कार्यकरत्यांसह ठिय्या मांडला. यावेळी आव्हाड म्हणाले, मार खाणाऱ्याला पोलिसांकडून अटक केली जात आहे. तर मारहाण करणाऱ्या पाच जणांची पोलिसांकडून पाठराखण केली जात असल्याचे म्हणत त्यांना पोलीस वडापाव आणि तंबाखू मळून देतात असंही म्हटलं.

Published on: Jul 18, 2025 08:42 AM