Video |आमदार जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावर बसून प्रवास, PM मोदींच्या आवाहनाचा अनोखा निषेध

| Updated on: May 12, 2026 | 5:58 PM

आखाती देशांमध्ये वाढत चाललेल्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता वाढली आहे. विशेषत: इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होत असल्याने त्याचा परिणाम इंधन आणि सोन्याच्या बाजारावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना पेट्रोल-डिझेल, तेल खरेदीबाबत संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.

आखाती देशांमध्ये वाढत चाललेल्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता वाढली आहे. विशेषत: इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होत असल्याने त्याचा परिणाम इंधन आणि सोन्याच्या बाजारावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना पेट्रोल-डिझेल, तेल खरेदीबाबत संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. यावर अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड चक्क घोड्यावर बसून आले आणि त्यानी पंतप्रधान मोदींच्या वक्त्वयावर टीका केली. त्यांच्या या व्हिडीओची सध्या सर्वत्र चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींचा निषेध करण्यासाठी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना बैलगाडी आणि घोड्याचा उल्लेख केला होता.

आव्हाड यांनी सांगितलं की, मोदींच्या धोरणांमुळे देशाला 2000 वर्षे मागे जावे लागेल आणि जनतेला पुन्हा बैलगाडी, घोडा किंवा गाढवावरून प्रवास करावा लागेल.त्यांनी उपहासाने म्हटले की, मोदींनी सांगितल्याप्रमाणे आता मंत्र्यांनी मंत्रालयात जाताना घोड्यावर किंवा बैलगाडीवरून जावे.

Published on: May 12, 2026 05:39 PM
Follow Us