विधानभवन परिसरात पत्रकारांना धक्काबुक्की, माध्यमांच्या प्रतिनिधींचंच आंदोलन; शिंदे हात जोडून म्हणाले…

विधानभवन परिसरात पत्रकारांना धक्काबुक्की, माध्यमांच्या प्रतिनिधींचंच आंदोलन; शिंदे हात जोडून म्हणाले…

| Updated on: Mar 18, 2025 | 12:53 PM

सुरक्षारक्षकांसह पोलिसांकडून वारंवार पत्रकारांना धक्काबुक्की केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे. बघा नेमकं काय घडलं?

विधानभवनात लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारांना आज धक्काबुक्की झाली आहे. आज सकाळी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. यानंतर त्याचे पडसाद उमटताना दिसताय. विधानभवन परिसरात सुरक्षारक्षकांकडून पत्रकारांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे. केवळ धक्काबुक्कीच नाहीतर पत्रकारांना शिवीगाळ देखील करण्यात अल्याचे माध्यमांच्या प्रतिनिधींनी सांगितले. दरम्यान, या पत्रकारांमधील महिला पत्रकारांनाही धमकावल्याची माहिती समोर येत असून याप्रकरणी विधानभवन परिसरातच मराठी आणि हिंदी पत्रकारांनी आंदोलन पुकारलं आहे. ‘तुम्हाला बघून घेऊ, अशी उघडपणे पोलिसांकडून धमकी देण्यात आली आहे. तर विधानभवन परिसरातच पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली आहे.’, असं सांगत असताना पोलिसांविरोधात आमचं आंदोलन असल्याचे माध्यमांच्या प्रतिनिधींनी सांगितले. पत्रकारांचे म्हणणं यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शांतपणे ऐकून घेतले आणि मुख्यमंत्री आणि विधानसभेचे अध्यक्ष यांच्या कानावर हा प्रकार घालतो त्यांच्याशी बोलतो. तुमच्या भावना योग्य आहे. असे व्हायला नको. लोकांना न्याय तुम्ही मिळवून देतात, असे म्हणत यातून मार्ग काढणार असल्याचे आश्वासनही शिंदेंनी दिले.

Published on: Mar 18, 2025 12:53 PM