Kalyan Breaking : खेळायला गल्लीत गेला, परत येताना मात्र..; शाळेची भिंत कोसळून चिमूकल्याचा दुर्दैवी अंत
शाळेची भिंत कोसळून कल्याणमध्ये अपघात झाला आहे. यात एका मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे.
कल्याणच्या बल्यानी परिसरातील शाळेची भिंत कोसळली आहे. यात एका 11 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 3 मुलं जखमी झालेले आहेत.
टिटवळा येथील केबीके इंटरनॅशनल शाळेची भिंत कोसळली आहे. या शाळेजवळ मुलं खेळत असताना ही भिंत कोसळल्याने ही दुर्घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे ही भिंत कोसळण्याच्या अवस्थेत असल्याचं स्थानिकांनी वारंवार शाळा प्रशासनाला सांगितलं होतं. मात्र त्यावर काहीही उपाय करण्यात आला नाही. त्यामुळे आज एका 11 वर्षीय लहान मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. ही दुर्घटना शाळेच्या दुर्लक्षामुळे झाल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. यात जखमी झालेल्या प्रकृती देखील सध्या गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. शाळा प्रशासनाच्या हलगर्जीपणावर कारवाईची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
Published on: May 30, 2025 07:36 PM
