Kalyan : रिसेप्शनिस्ट मुलीनं आधी मारहाण केली? मग सगळा प्रकार घडला? नेमकं सत्य काय? तरूणीनं सांगितलं कारण
कल्याण मारहाण प्रकरण वेगळ्या वळणावर पोहोचलं असून या प्रकरणातील नवा व्हिडीओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे. नव्या व्हिडीओमध्ये जिला मारहाण झाली ती तरूणीच एका महिलेला मारहाण करताना दिसतेय? नेमकं काय सत्य? बघा मुलीनं काय केला खुलासा?
कल्याण येथील नांदिवली परिसरात असणाऱ्या एका खाजगी रूग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या मराठी तरूणीला एका परप्रांतीय व्यक्ती गोकुळ झाने जबर मारहाण केली. त्या मुलीचे केस धरून तिला फरपटत ओढलं. इतकंच नाहीतर तिच्या छातीवर लाथा-बुक्क्या मारल्या यामध्ये तिला गंभीर दुखापत झाली. याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून मारहाण करणारा दोन दिवस पोलिसांच्या ताब्यात आहे. अशातच गोकुळ झा नावाच्या व्यक्तीच्या वाहिनीला रुग्णालयात मारहाण करण्यात आली असा दावा करणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये ही मराठी तरूणी त्या व्यक्तीच्या वहिनीला कानशिलात लगावताना दिसतेय. मात्र नेमका हा प्रकार काय आहे? रिसेप्शनिस्ट मुलीनं आधी मारहाण केली की नंतर? मारहणीची घटना घडल्यानंतर मलीने त्या व्यक्तीच्या वहिनीला मारहाण केली की आधी? असे प्रश्न त्या नव्या व्हिडीओ नंतर उपस्थित होत आहेत. या व्हिडीओवर त्या तरूणीनेच खुलासा केला आहे. बघा काय म्हणाली तरूणी?
