निवडणुकीपूर्वीच रोहित पवारांना धक्का; ‘… ते मला पसंत पडलं नाही’, आरोप करत ज्येष्ठ नेत्यानं सोडला पक्ष

निवडणुकीपूर्वीच रोहित पवारांना धक्का; ‘… ते मला पसंत पडलं नाही’, आरोप करत ज्येष्ठ नेत्यानं सोडला पक्ष

| Updated on: Aug 26, 2024 | 1:35 PM

शरद पवार गट राष्ट्रावादीचे नेते, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर रोहित पवारांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कर्जत-जामखेडचे तालुकाध्यक्ष मधुकर राळेभात यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर रोहित पवार यांनी राजीनामा देताना मधुकर राळेभात यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे.

रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना दुय्यम वागणूक दिली, असे म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कर्जत-जामखेडचे तालुकाध्यक्ष मधुकर राळेभात यांनी रोहित पवारांवर आरोप केला आहे. तर मधुकर राळेभात यांनी राजीनामा दिल्याने आगामी निवडणुकीपूर्वीच रोहित पवारांना हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. ‘शरदचंद्र पवारांवर विश्वास ठेवून मी या पक्षात प्रवेश केला होता. गेली ३० वर्ष मी शिवसेनेचं काम केले. त्यानंतर मी राष्ट्रवादीत प्रवेश केला. रोहित पवारांना निवडून आणण्यासाठी आम्ही जीवाचं रान केले. त्यावेळी या तालुक्यातील भूमिपुत्र असलेले माजी कॅबिनेट मंत्री यांना पराभूत करून रोहित पवारांना निवडून आलं. परंतु रोहित पवारांची काम करण्याची पद्धत आणि कार्यकर्त्यांसोबत जे वागणं आहे ते मला पसंत पडलं नाही. त्यांनी कार्यकर्त्यांना दुय्यम वागणूक दिली. त्यामुळे मी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.’, असं त्यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना म्हटले.

Published on: Aug 26, 2024 01:35 PM