Karuna Sharma : रिकामं का बसता? जो पैसा जमवला तो… मुंडेंच्या ‘त्या’ विधानावर करुणा शर्मांची टीका

Karuna Sharma : रिकामं का बसता? जो पैसा जमवला तो… मुंडेंच्या ‘त्या’ विधानावर करुणा शर्मांची टीका

| Updated on: Sep 23, 2025 | 11:50 PM

करुणा शर्मांनी धनंजय मुंडेंच्या कामकाजाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी जमवलेल्या पैशांचा योग्य वापर न झाल्याचा आरोप करुणा शर्मांनी केला आहे. त्यांनी धनंजय मुंडेंना जनतेला उत्तर देण्याचे आवाहन केले आहे.

करुणा शर्मांनी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून धनंजय मुंडेंवर टीका केली आहे. करुणा शर्मांनी धनंजय मुंडेंना शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी जमवलेल्या पैशांचा वापर करा, असा सल्ला दिलाय. यासह त्यांनी असा आरोप केला की, धनंजय मुंडेंकडे आपले मंत्रिपद असताना जनतेसाठी काहीही काम केले नाहीत आता शेतकऱ्यांसाठी करा, असं त्यांनी म्हटलंय. करुणा शर्मांनी धनंजय मुंडेंना आपल्या संपत्तीचा शेतकऱ्यांना फायदा करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी कृष्णा आंधळे यांच्याबद्दलही प्रश्न उपस्थित केले आहेत. बीड आणि परळीच्या जनतेने गेल्या अनेक वर्षांपासून धनंजय मुंडेंना पाठिंबा दिला आहे, पण त्यांच्या कामगिरीने निराशा झाल्याचे करुणा शर्मांनी  म्हटले आहे.

Published on: Sep 23, 2025 11:50 PM