Turkey Trips Canceled : भारतीय पर्यटकांनी टाकला तुर्कीवर बहिष्कार; सगळ्या सहली रद्द

Turkey Trips Canceled : भारतीय पर्यटकांनी टाकला तुर्कीवर बहिष्कार; सगळ्या सहली रद्द

| Updated on: May 16, 2025 | 4:57 PM

Kesari Tours Turkey Trips Canceled : भारत पाकिस्तानमधील वाढत्या तणावानंतर तुर्कीने पाकिस्तानला उघड पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता भारतीयांकडून तुर्कीवर बहिष्कार टाकण्यात येत आहे.

केसरी टुर्स अँड ट्रॅव्हल्सकडून तुर्कीला जाणाऱ्या सगळ्या सहली आता रद्द करण्यात आलेल्या आहेत. भारताच्या विरोधात जाऊन शत्रू राष्ट्राला मदत करणाऱ्या देशातल्या सहली आम्ही स्वत: रद्द केल्या असल्याचं केसरी टुर्सचे संचालक हिमांशु पाटील यांनी दिलेली आहे.

भारत पाकिस्तानमधील वाढत्या तणावानंतर तुर्कीने पाकिस्तानला उघड पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता भारतीयांकडून तुर्कीवर बहिष्कार टाकण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर तुर्कीला जाणाऱ्या सहली देखील मोठ्या प्रमाणावर रद्द होत आहेत. भारतीय पर्यटकांकडून आता या देशावर बहिष्कार टाकण्यात येत आहे. काही ट्रॅव्हल कंपन्यांनी तुर्की आणि अझरबैजानला जाणाऱ्या सहली रद्द करण्याची शिफारस केली आहे. केसरी टुर्स अँड ट्रॅव्हल्सकडून देखील आता तुर्कीला जाणाऱ्या सगळ्या सहली रद्द करण्यात आलेल्या आहेत. भारताच्या विरोधात जाऊन शत्रू देशाला मदत करणाऱ्या देशात सहल घेऊन जाणार नाही अशी भूमिका केसरी टुर्स अँड ट्रॅव्हल्सच्या संचालकांकडून घेण्यात आलेली आहे. 

Published on: May 16, 2025 04:57 PM