Khawaja Asif : पाकिस्तानची सर्वात मोठी कबुली… ती आमची चूक, US च्या इशाऱ्यावरून घाणरडं कृत्य अन्… पाक संरक्षण मंत्र्यांना पश्चाताप?
ख्वाजा आसिफ यांनीही कबूल केले की दहशतवाद्यांना पाठिंबा देणे किंवा प्रशिक्षण देणे ही एक मोठी चूक होती. याची शिक्षा आपण भोगत आहोत. जर आपण सोव्हिएत युनियन विरुद्धच्या युद्धात सामील झालो नसतो आणि ९/११ च्या हल्ल्यानंतर उद्भवलेली परिस्थिती उद्भवली नसती तर पाकिस्तानचा रेकॉर्ड निष्कलंक राहिला असता, असंही त्यांनी म्हटलं.
देशात भारत पाकिस्तानात युद्धजन्य परिस्थिती असताना या दरम्यान, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी एक मोठी कबूली दिली आहे. पाकिस्तान गेल्या 30 वर्षांपासून दहशतवाद्यांना पाठिंबा आणि प्रशिक्षण देत आहे. अतिरेक्यांना पोसण्याचं काम अमेरिका आणि पाश्चात्य देशांच्या सांगण्यावरून केलं असून अमेरिका आणि पाश्चात्य देशांसाठी हे घाणेरडे काम करत आहेत, असं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटलंय. शुक्रवारी ख्वाजा आसिफ यांनी ब्रिटिश वृत्तपत्र द स्कायला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी ही मोठी कबुली दिली. या मुलाखतीत मंत्री ख्वाजा आसिफ यांना विचारण्यात आले की, दहशतवादी गटांच्या कारवायांसाठी पाकिस्तान जबाबदार आहे का? यावर ते म्हणाले, जागतिक शक्तींनी त्यांच्या हितासाठी पाकिस्तानचा वापर केला.
Published on: May 09, 2025 11:08 AM
