Kirit Somaiya on Sanjay Raut : संजय राऊतांवर ईडी कारवाई, हिशोब तर द्यावाच लागणार, किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया

| Updated on: Jul 31, 2022 | 10:00 AM

भाजप नेते किरीट सोमय्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलीय. शिवसेना नेते संजय राऊत यांची जागा नवाब मलिकांच्या शेजारीच असावी अशी राज्यातील साडेबारा कोटी जनतेची इच्छा आहे, असं सोमय्या म्हणाले.

Follow us on

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay raut) यांच्या घरी छापेमारी केली आहे. राऊत यांच्या घरी सकाळीच ईडीचे अधिकारी (ED) आणि सीआरपीएफचे जवान दाखल झाले. राऊत यांच्या घराची झाडाझडती सुरू करण्यात आली असून त्यांच्याकडील कागदपत्रांची छाननी करण्यात येणार आहे. गोरेगावच्या 1 हजार 34 कोटी रुपयांच्या पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी ईडी कारवाई करण्यात आली आहे. राऊत यांची चौकशीही केली जाणार असल्याचं वृत्त आहे. त्यामुळे राऊत यांची कोंडी झाली आहे. दरम्यान, ‘शिवसेना नेते संजय राऊत यांची जागा नवाब मलिक यांच्या शेजारीच असावी अशी राज्यातील साडेबारा कोटी जनतेची इच्छा आहे, असं सोमय्या म्हणाले. तसेच राऊत हे परदेशात कुटुंबासह फिरायला जात होते. त्याचा पैसा आला कुठून? त्यांचे हॉटेलचे बिल कोण देत होते?,’ अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी दिली आहे.