Vaibhav Naik | किरीट सोमय्यांनी नारायण राणेंच्या बंगल्याची पाहणी करावी, वैभव नाईकांचं आव्हान
दापोली आणि मुरुड येथील मिलिंद नार्वेकर यांनी कोणतीही परवानगी न घेता समुद्र किनारी बंगला बांधल्याचा आरोप भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता.
सिंधुदुर्ग : शिवसेना आमदार वैभव नाईक यांचे भाजपचे माजी खासदार डॉ किरीट सोमय्या यांना आव्हान. मिलिंद नार्वेकर यांनी बांधलेल्या बंगल्याचे पडलेले बांधकाम पाहायला येण्याआधी नारायण राणे यांचा जुहूमधील आलिशान बंगला आणि सिंधुदुर्गात केलेल्या अनधिकृत बांधकामाचीही पाहणी करावी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खाजगी सहाय्य्क मिलिंद नार्वेकर यांच्या मुरुड येथील नवीन बंगल्याच्या बांधकामबाबत तक्रार झाल्यावर त्यांनी रविवारी स्वतःच आपला बंगला पाडून टाकण्याचे काम सुरु केले. हे काम रविवारी सायंकाळपर्यंत सुरु होते. दापोली आणि मुरुड येथील मिलिंद नार्वेकर यांनी कोणतीही परवानगी न घेता समुद्र किनारी बंगला बांधल्याचा आरोप भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. नार्वेकर यांच्या बंगला तोडून टाकण्याबाबत महसूल विभागाला अद्याप कोणत्याही प्रकारचे आदेश प्राप्त झालेले नाहीत. यामुळे महसूल विभागाने ही कारवाई केलेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे सदर बंगला हा मिलिंद नार्वेकर यांनी स्वतःच पाडण्याचे काम हाती घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
