बिल्डर्सना ईडीच्या धमक्या देऊन किरीट सोमय्यायांनी पैसे लाटले – संजय राऊत

बिल्डर्सना ईडीच्या धमक्या देऊन किरीट सोमय्यायांनी पैसे लाटले – संजय राऊत

| Edited By: | Updated on: Feb 16, 2022 | 11:32 AM

बईतील बिल्डरांकडून पैसे घेतले गेले.आठ जेवीपीडी स्कीम, सुजीत नवाब नावाचा प्लॉट आहे. किरीट सोमय्या आणि  मित्र अमित देसाई या दोघांनी मूळ मालकाला ईडीची धमकी देऊन 100 कोटीचा (100 Cr) प्लॉट मातीमोल किमतीत स्वत: च्या नावावर करुन घेतला.

ईडीच्या (ED) नावावर धमक्या , क्रिमिनल सिंडिकेट, ईडीला पैसे द्यावे लागतात, याचा लवकरच भांडाफोड होईल. काल मी 19 बंगले दाखवा म्हणलं दाखवलं का? अर्जून खोतकर (Arjun Khotkar) यांना किती त्रास दिला. मुंबईतील बिल्डरांकडून पैसे घेतले गेले.आठ जेवीपीडी स्कीम, सुजीत नवाब नावाचा प्लॉट आहे. किरीट सोमय्या आणि  मित्र अमित देसाई या दोघांनी मूळ मालकाला ईडीची धमकी देऊन 100 कोटीचा (100 Cr) प्लॉट मातीमोल किमतीत स्वत: च्या नावावर करुन घेतला. 110 कोटीची जमीन मातीमोल किमतीला घेतली.ईडीच्या नावावर काय चाललेय हे देशाला कळायला पाहिजे. त्यातील 15 कोटी रुपये ईडीच्या अधिकाऱ्याला दिले आहेत. ईडीनं त्याची दखल घ्यावी, अन्यथा ईडीनं अधिकाऱ्याची नावं जाहीर करु, असं संजय राऊत म्हणाले.

Published on: Feb 16, 2022 11:32 AM