Kishori Pednekar : त्यांचा पहिलं बाप हो, मग दुसऱ्याचा बाप… पडणेकरांचा एकेरी भाषेत जिव्हारी लागणारा फुकेंवर पलटवार

Kishori Pednekar : त्यांचा पहिलं बाप हो, मग दुसऱ्याचा बाप… पडणेकरांचा एकेरी भाषेत जिव्हारी लागणारा फुकेंवर पलटवार

| Updated on: Aug 04, 2025 | 3:27 PM

भाजप आमदार परिणय फुके यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर ते आता चांगलेच कोंडीत सापडले आहे. शिवसेनाचा बाप मीच असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केलं आणि शिंदेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली.

भंडारा जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात भाजप आमदार परिणय फुके यांनी एक वक्तव्य केलं आणि ते चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेचा बाप मीच, असं वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार परिणय फुके यांनी केलंय. परिणय फुके यांच्या या वक्तव्यानंतर शिंदेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली असून परिणय फुके यांनी माफी मागावी, अशी मागणी केली जात असताना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘दोन मुलांना घेऊन बायको लोकांच्या दारात फिरते. पहिले त्या मुलांचा बाप हो…मग दुसऱ्याचे बाप बना..’, अशा शब्दात किशोरी पेडणेकर यांनी परिणय फुके यांना उत्तर देत जिव्हारी लागणारा पलटवार केलाय. इतकंच नाहीतर फुके तो फुकेच काहीही बोलतो… असंही किशोरी पेडणेकर यांनी परिणय फुके यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलंय.

Published on: Aug 04, 2025 03:27 PM