Controversial Ministers : ‘या’ 5 मंत्र्यांना बडतर्फ करा, ठाकरेंच्या नेत्यांची थेट राज्यपालांकडे लिस्ट, मागणी काय; पहिला नंबर कोणाचा?
कृषीमंत्री कोकाटेंचे अजित पवारांसोबत बैठक होणार होती पण दोघांची बैठक काही झाली नाही. तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेने एकूण पाच मंत्र्यांची नावे राज्यपालांना दिलीत आणि या पाच मंत्र्यांना बडतर्फ करा अशी मागणी करण्यात आली आहे.
काही मंत्र्यांकडून चुका झाल्या आणि असंवेदनशील वक्तव्यही झाले. असं खुद्द मुख्यमंत्री फडणवीसांनी मान्य केलं. तर दुसरीकडे वादग्रस्त मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेने राज्यपालांची भेट घेतली. पाच जणांची नावे ठाकरेंच्या शिवसेनेने राज्यपालांना दिली. पहिल्या क्रमांकावर आहेत योगेश कदम, दुसऱ्या क्रमांकावर गिरीश महाजन, मंत्री संजय शिरसाट, माणिकराव कोकाटे आणि नितेश राणे. या पाच मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढा अशी मागणी विरोधकांनी केली.
मंत्री कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ, पैशांच्या बॅगसोबत व्हायरल झालेला मंत्री शिरसाटांचा व्हिडिओ असेल. योगेश कदमांच्या आईच्या नावाने असलेल्या बारमध्ये 22 बारबाला सापडल्याचं प्रकरण असो की हनी ट्रॅपवरून आरोप झालेले गिरीश महाजनांमुळे विरोधक सरकारवर तुटून पडले. आता ठाकरेंची शिवसेना थेट राज्यपालांकडे आली. तर काही प्रमाणात चुका झाल्यात मात्र विरोधकांना नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री म्हणतायंत.
