Kolhapur | मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ

| Updated on: Jul 07, 2022 | 10:58 AM

गेल्या दोन ते तीन दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचांगा नदीच्या पाणी पातळी वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी सत्य तीस फुटांवर असून नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे.

Follow us on

गेल्या दोन ते तीन दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचांगा नदीच्या पाणी पातळी वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी सत्य तीस फुटांवर असून नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन देखील आता अलर्ट मोडवर आलय… कोल्हापुरात एनडीआरएफच्या दोन टीम दाखल झाल्या आहेत. या टीमने आज पंचगंगा पुलावर नदीच्या पाणी पातळीचा आढावा घेतला.. पाणी पातळीतील वाढ, पाण्याचा वेग याची माहिती एनडीआरएफच्या जवानांसह अधिकाऱ्यांनी घेतलीय… सध्या पूरस्थिती नसली तरी तशी स्थिती उद्भवल्यास आधुनिक उपकरणांसह एनडीआरएफ ची टीम सज्ज असल्याचं टीम चे प्रमुख शरद पाटील यांनी tv9 शी बोलताना सांगितलय.