Madhuri In Vantara : ‘त्या’ दोघींचा फेरफटका… वनतारात मिळाली खास मैत्रीण… माधुरी अन् गीता साथसाथ

Madhuri In Vantara : ‘त्या’ दोघींचा फेरफटका… वनतारात मिळाली खास मैत्रीण… माधुरी अन् गीता साथसाथ

| Updated on: Aug 07, 2025 | 5:04 PM

माधुरी हत्तीणीला पुन्हा कोल्हापूरमध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र सरकार, नांदणी मठ प्रशासन आणि वनतारा यांनी मिळून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे माधुरी लवकरच पुन्हा कोल्हापूरमध्ये परतण्याची शक्यता आहे.

गुजरातमध्ये असलेल्या वनतारा येथील प्राणी संवर्धत केंद्रात रेस्क्यू केलेल्या हत्तींसह कोल्हापुरातील नांदणी मठातील माधुरी हत्तीणीची देखील काळजी घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. वनतारा केंद्रात हत्तींची काळजी घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानकांनुसार अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. दरम्यान, काही दिवस उलटून गेल्यानंतर वनतारा येथे माधुरी हत्तीणीला अनेक नवीन मित्र-मैत्रिणी भेटल्या आहेत. वनताराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, माधुरी हत्तीणीचे तिथे चांगल्याप्रकारे संगोपन होत आहे आणि ती तिथे आलेल्या इतर हत्तींच्या कळपात रुळली आहे. वनतारा येथील हत्तींच्या दैनंदिन जीवनाबद्दल जाणून घेण्यासाठी वनतारात टीव्ही ९ दाखल झाली. यावेळी माधुरीचा दिनक्रम जाणून घेत असताना माधुरी आपल्या नवीन मित्रांसोबत हिंडताना, फिरताना आणि खाताना आनंदी दिसत आहे. तिला तिच्या नवीन घरामध्ये आवश्यक असलेली सर्व काळजी आणि वैद्यकीय मदत मिळत आहे.

Published on: Aug 07, 2025 04:58 PM