Big Breaking | उद्धव ठाकरेंना जबर धक्का, कोणतंही कारण न सांगता जिल्हाप्रमुखाने थेट….कोल्हापुरात नेमकं काय घडलं?

Big Breaking | उद्धव ठाकरेंना जबर धक्का, कोणतंही कारण न सांगता जिल्हाप्रमुखाने थेट….कोल्हापुरात नेमकं काय घडलं?

| Updated on: Jun 25, 2026 | 4:59 PM

कोल्हापुरातील ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

कोल्हापुरातील ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पक्ष नेतृत्वाकडे आपला राजीनामा सादर केला असून त्यांच्या या निर्णयामुळे कोल्हापूरच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले आहे.

रविकिरण इंगवले यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात कोणतेही कारण अथवा राजकीय विश्लेषण न देता पदाचा राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यामागे नेमके कारण काय याबाबत कार्यकर्ते आणि राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.

रविकिरण इंगवले हे शिवसेनेतील जुने आणि सक्रिय पदाधिकारी मानले जातात. त्यांनी यापूर्वी 2 वेळा शहर प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर पक्षाने त्यांच्यावर जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवली होती. सध्या ते जिल्हाप्रमुख म्हणून काम पाहत होते. त्यांच्या अचानक झालेल्या राजीनाम्यामुळे ठाकरे गटातील अंतर्गत हालचालींना वेग आल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Published on: Jun 25, 2026 4:59 PM
Follow Us