Pune Bridge Collapse Update : मुलासोबतचा फादर्स डे ठरला शेवटचा; कुंडमळा पूल अपघातात बाप-लेकाचा दुर्दैवी अंत

Pune Bridge Collapse Update : मुलासोबतचा फादर्स डे ठरला शेवटचा; कुंडमळा पूल अपघातात बाप-लेकाचा दुर्दैवी अंत

| Updated on: Jun 16, 2025 | 4:58 PM

Pune Bridge Collapse Update News : इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल अपघातात पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्या बाप-लेकाचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे चिंचवड परिसरावर शोककळा पसरली आहे.

इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल अपघातात पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्या बाप-लेकाचा मृत्यू झाला आहे. रोहित सुधीर माने (वय 30 वर्ष) असं मृत वडिलांचं नाव आहे. तर विहान सुधीर माने (वय 6 वर्ष) असं चिमुकल्याचं नाव आहे. रोहित माने हे एका खासगी कंपनीत कामाला होते. काल रविवारची सुट्टी आणि फदर्स डे असल्याने रोहित बायको आणि मुलासोबत कुंडमळा येथे फिरण्यासाठी आले होते. त्यावेळी पूल कोसळल्याची घटना घडली. या कोसळलेल्या पुलाच्या खाली रोहित आणि विहान सापडले, त्यातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. या दुर्घटनेत बाप-लेकाचा मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आपला पती आणि मुलगा आपल्याला कायमचा सोडून गेला आहे, याची कल्पना देखील अजूनही शमिकाला दिली नाही. या दुर्दैवी घटनेमुळे चिंचवड परिसरावर शोककळा पसरली आहे.

Published on: Jun 16, 2025 04:58 PM