Ladki Bahin Yojana : खऱ्या लाडक्या बहिणींची फसवणूक; धक्कादायक बाब उघड, सरकारी कर्मचारी तरीही लाटले 3 कोटी
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असताना धक्कादायक बाब समोर आली आहे. सरकारी कर्मचारी असलेल्या अनेकांनी फसवणूक करत या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे.
गेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महायुती सरकारच्या गेमचेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यातील २ हजार ६५२ सरकारी कर्मचाऱ्यांकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यात आला आहे. १ लाख २० हजार कर्मचाऱ्यांच्या तपासणीतून ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. तर सरकारी कर्मचाऱ्यांनीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तब्बल ३ कोटी ५८ लाख रूपये लाटल्याचे आता उघड झाले आहे. मात्र सरकारी कर्मचारी असलेल्या लाडक्या बहिणींकडून हा सगळा पैसा वसुल करण्यात येणार आहे. तर आणखी सहा लाख कर्मचाऱ्यांची तपासणी केली जाणार असून सामान्य प्रशासन लवकरच सर्व विभागांना यासंदर्भातील आदेश देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.
Published on: May 30, 2025 09:04 AM
