Ladki Bahin Yojana : ‘लाडकी’त घुसखोरी केलेल्या पुरूषांकडून ‘बहिणीं’चे पैसे वसूल करणार, सरकार अ‍ॅक्शन मोडवर

Ladki Bahin Yojana : ‘लाडकी’त घुसखोरी केलेल्या पुरूषांकडून ‘बहिणीं’चे पैसे वसूल करणार, सरकार अ‍ॅक्शन मोडवर

| Updated on: Aug 05, 2025 | 10:51 AM

आम्हीच निवडणूक काळात कमी वेळ होता म्हणून अर्जांना वेगाने मंजुरी दिल्याची कबुली सरकारनेच दिली असताना आता मात्र अपात्र अर्जांवर कारवाई सुरू करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत झालेल्या भ्रष्टाचारानंतर सरकारकडून मोठी अॅक्शन घेण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या पुरूषांकडून आता पैसे वसूल करण्यात येणार आहे. सरकारकडून गैरमार्गाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थी पुरूषांना नोटीस जारी करण्यात आली आहे. येत्या महिन्याभरात पैसे परत न केले नाहीतर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या कारवाईचा इशारा सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून लाभ घेतलेल्या लाभार्थी पुरूषांना देण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेमधील २६ लाख अर्जांची पडताळणी करून सरकार त्यावर योग्य ती कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले होते. म्हणजेच ज्यांनी चुकीची माहिती दिली असेल किंवा काही तांत्रिक अडचणी आल्या असतील असे २६ लाख अर्ज सरकार तपासणार आहे. मात्र तसं असेल तर निवडणुकांच्या तोंडावर इतके लाखो अर्ज मंजूर कसे झाले? असा सवाल विरोधकांनी केला होता. दरम्यान, विरोधकांकडून टीका होत असताना निवडणुकीपूर्वी प्रत्येक भाषणात लाडकी बहीण योजनेवर भर देणारे सत्ताधाऱ्यांकडूनच आता लाडक्या बहीण योजनेत पुरुष घुसल्याचा दावाही करण्यात आलाय.

Published on: Aug 05, 2025 10:48 AM