Parth Pawar Land Deal : जमीन व्यवहार प्रकरण, तिघांवर मुद्रांक शुल्क फसवणुकीचा ठपका अन् गुन्हा, पार्थ पवारांची भूमिका काय?

Parth Pawar Land Deal : जमीन व्यवहार प्रकरण, तिघांवर मुद्रांक शुल्क फसवणुकीचा ठपका अन् गुन्हा, पार्थ पवारांची भूमिका काय?

| Updated on: Nov 06, 2025 | 11:35 PM

पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि निलंबित उपनिबंधक रवींद्र तारू यांच्यासह तिघांवर मुद्रांक शुल्कात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. अमिडिया कंपनीने सहा कोटींची स्टॅम्प ड्युटी भरली नसल्याचे समोर आले आहे. पार्थ पवारांविरोधात थेट तक्रार नसली तरी, त्यांची चौकशी केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पार्थ पवार यांच्याशी संबंधित जमीन व्यवहार प्रकरणात मुद्रांक शुल्कामध्ये फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि निलंबित उपनिबंधक रवींद्र तारू अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या तिघांवर शासनाच्या मुद्रांक शुल्काची फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

अमिडिया कंपनी जमीन व्यवहार प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. अमिडिया कंपनीने संबंधित जागेसाठी सहा कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शीतल तेजवानी यांच्याकडे संबंधित जागेची पॉवर ऑफ अटर्नी होती, तर दिग्विजय पाटील हे अमिडिया कंपनीचे संचालक म्हणून खरेदीदार होते.

उपनिबंधक रवींद्र तारू यांनी या व्यवहाराची कागदपत्रे तयार करून दिली होती. या प्रकरणी पार्थ पवारांविरोधात कोणतीही थेट तक्रार दाखल झालेली नाही. मात्र, त्यांची चौकशी केल्यानंतर या प्रकरणातील सर्व गोष्टी स्पष्ट होतील, असे पोलिसांनी म्हटले आहे. दस्त नोंदणी अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Published on: Nov 06, 2025 11:34 PM